आता , नेत्यांसमोर  मोताळा तालुक्यातील ५ मतदारसंघ काबीज करण्याचे पंचरंगी आव्हान! वाचा कोणत्या गटात कोणती गावे..

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आक्रमक डावपेच  आणि विकासाचा झंझावात अश्या दुहेरी पद्धतीने  राजकारण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या मोताळा तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या ५ तर पंचायत समिती गणांची  संख्या १० झाली आहे. त्यामुळे आता  पाच गटात विजय मिळविण्याचे आव्हान सर्व पक्षासमोर उभे ठाकनार आहे. 

 तालुक्याची प्रारूप प्रभाग रचना आज प्रसिद्ध करण्यात आली. तळणी जिल्हा परिषद गटातील पिंपरी आंधळी गणात निपाणा, सावरगाव जहांगीर, आव्हा युनूसपुर, टाकळी घडेकर, वडगाव जमालपूर, माकोडी, पिंप्री गवळी, संगलद, टेंभी, न्हावी, शेलगाव बाजार, याकतपुर, जहांगीरपूर तर  तळणी गणात दाभाडी, तळणी,पिंपळपाटी, घुसर बुद्रुक  व खुर्द, शेलापूर खुर्द व बुद्रुक, तालखेड, महाल पिंप्री या गावांचा समावेश आहे.  कोथळी गटातील कोथळी गणात आडविहिर, जयपूर, जनुना, कोथळी, धामणगाव देशमुख, निमखेड, रामगाव, पिंपळगाव नाथ, गिरोली, चिंचखेडनाथ, इसलावाडी, मोयखेड  या गावांचा समावेश आहे.

पोफळी गनात  इब्राहिमपूर, सुल्तानपूर, लाणघाट, काजमपूर ,वरुड, तिघरा, डिदोल बुद्रुक व खुर्द,  नळगंगा पूर, चिंचपूर, संगलद, भोरटेक, पुन्हाई, रिधोरा जहांगीर, काबरखेड, हनवत खेड, दुधमाल, चावरदा, धोनखेड, पोफळी ही गावे आहे. धामणगाव बढे जीप गटातील लिहा बुद्रुक गणात कोल्ही गवळी, गुगळी, सिरमिल, लिहा बुद्रुक, पिंपळगाव देवी, उरहा, दहिगाव, माळेगाव, चिंचखेड खुर्द, महालुंगी जहांगीर, वडगाव महालुंगी,सिंदखेड,  ही गावे आहे. धामणगाव बढे णात  लपाली, सोनबरड , रिधोरा खं, वाडी, निमखली, पांगरखेड, धामणगाव बढे ही गावे आहे. 

रोहिनखेड गटातील सारोळा मारोती गणात ब्राम्हणदा खांडवा, चुनपिंप्री, बेहरड, कोरहाला, खेडी, जमालपूर, पान्हेरा,  किन्होळा, तपोवन, काळेगाव, पोखरी, सारोळा मारोती, फरदापुर, सारोळा पिर, ही गावे समाविष्ट आहे. रोहिनखेड गणात वडगाव खं, अजदरड, रोहिनखेड, थड, उबाळखेड, सोनबरड, कुहरा, गुळभेली, शहापूर, गोतमारा, हनवतखेड, ही गावे आहे. तरोडा गटातील राजूर गणात खामखेड, राहेरा, आमदरी, मोहेंगाव ,खडकी, खैरखेड, दाभा, नलकुंड, दाभा तांडा, राजूर, मूर्ती, टाकळी, वाघजाळ, अंतरी, तर तरोडा गणात बोराखेडी, खरबडी, शिरवा, सहस्त्र मुळी, जामठी, परडा, वारुळी, नेहरूनगर, हरमोड, तरोडा या गावांचा समावेश आहे.