चिखलीत काँग्रेसचा अतिक्रमण धारकांसाठी नगर परिषदेवर धडक मोर्चा! माजी आ.राहुल बोंद्रे म्हणाले,गोरगरिबांच्या हक्काच्या जागेसाठी काँग्रेस सदैव पाठीशी;
गोरगरीबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही म्हणाले; कुणाल बोंद्रे म्हणाले, कारवाई सूडबुद्धीने..!
धनदांडग्यांचे अतिक्रमण कायम असताना सर्वसामान्य गोरगरिबांना नोटीस पाठवणे कितपत योग्य असा सवाल चिखली काँग्रेसचे शहराध्यक्ष अतहरोद्दिन काझी यांनी यावेळी केला. उम्र बित जाती है एक घर बनाने मे , तुम तरस नही खाते बस्तिया उजाडने मे असे म्हणत कुणाल बोंद्रे यांनी नगर परिषद प्रशासनाची कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप केला. शहरातील माझ्या परिवारावर संकट असल्याने वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याचेही कुणाल बोंद्रे म्हणाले. यावेळी डॉ.मोहम्मद इसरार, निलेश अंजनकर, प्रदीप पचेरवाल यांचीही भाषणे झाले. चिखली शहरातील हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळुन या धडक मोर्चाला सुरुवात झाली होती.
विलास कंटुले, गोकुळ शिंगणे, गोपाल देव्हडे, विजय गाडेकर, अनिखॉ उस्मानखॉ, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, प्रशांत देशमुख, सुरेश बोंद्रे, सचिन शेटे, आश्विन जाधव, कैलास जंगले, शहजादअली खान, खलील बागवान, शिराज काझी, शेख आरिफ, अब्रार बागवान, अमोल सुरडकर, भास्कर चांदोरे, आकाश गाडेकर, पवन रेठे, अजय गवारगुरू, अकील खान, समद जमदार, अक्रम बागवान, सागर खरात यांच्यासह चिखली शहरातील शेकडो नागरिक,लघु व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले होते.