मेहकरच्या नेत्याचा "अश्लील व्हिडिओ" व्हायरल!  स्वतःच्या हाताने तोंड काळे करणे कशाला म्हणतात हे बातमी वाचल्यावर ध्यानात येईल...!

 
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या राजकारणात सध्या एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. एका पक्षाचा माजी शहर प्रमुख असलेल्या आणि माजी स्वीकृत नगरसेवक असलेल्या एका नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या नेत्याने स्वतःच हा व्हिडिओ शुट केल्याचे दिसते. एका महिलेसोबत खासगी क्षण व्यतीत करीत असतांना या नेत्याने "त्या" क्षणांचा व्हिडिओ काढला. त्यामुळे स्वतःच्या हाताने काढलेला हा व्हिडिओ या नेत्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पोहचला असून तो व्हिडिओ शेअर होत आहे.  या नेत्याने स्वतः व्हिडिओ शुट केला. त्यानंतर मेहकरातल्या एका व्हॉटस्ऍप गृपवर तो चुकीने शेअर झाला. चूक लक्षात येताच या नेत्याने तो व्हिडिओ डिलीट करण्याचा  प्रयत्न केला मात्र डिलीट एव्हरीवन करण्याऐवजी डिलीट फॉर मी केले अन् तिथेच कार्यक्रम फसला.

या नेत्याची पत्नी मेहकर शहरातल्या नामांकित शिक्षण संस्थेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. असे असताना नैतिक आणि अनैतिकतेचे भान न उरलेल्या या नेत्याचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही महिन्यांआधी महिलेच्या नातेवाईकांनी "त्या" दोघांना रंगेहाथ पकडल्याने आपल्याकडेही पुरावा असावा म्हणून त्या नेत्याने व्हिडिओ शुट केल्याचे समजते..मात्र हा व्हिडिओ आता चांगलाच अंगलट आला असून स्वतःच्या हाताने तोंड काळे करून घेणे "यालाच" म्हणतात अशी  खमंग चर्चा मेहकरात रंगत आहे.