आमदार श्वेताताई म्हणाल्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचा सन्मान हा भारतातील प्रत्येक महिलेचा सन्मान! चिखलीत पार पडला अभूतपूर्व अभिनंदन सोहळा! श्वेताताईंनी धरला आदिवासी नृत्यावर  ठेका!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देशाच्या संवैधानिक सर्वोच्य पदावर एका आदिवासी महिलेला बसवून जो सन्मान करण्यात आला तो सन्मान म्हणजे देशातील प्रत्येक महीलेचा सन्मान असून याबद्दल सर्व महिलांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानत असल्याचे  भावनिक प्रतिपादन चिखलीच्या आमदार सौ .श्वेताताई महाले पाटील यांनी केले.  महामहीम श्रीमती द्रौपदीजी मूर्मु यांच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल चिखली येथे आयोजित  अभिनंदन सोहळ्यात  त्या बोलत होत्या. चिखली येथील रामकृष्ण परमहंस मठात हा भव्यदिव्य व तितकाच पारंपरिक सोहळा पार पडला. 

चहावाल्याने आदिवासी महिलेला सर्वोच्च स्थानी बसविले
महामहीम द्रोपदी मुर्मू यांचा सन्मान म्हणजे  पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी  यांनी भारतातील संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे.  "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उधारी" आज एका महिलेवर भारतातील सर्वोच्च पदाचे जबाबदारी सोपवून मा . मोदीजींनी महिला सक्षमपणे काम करू शकतात हे दाखवण्याची संधी दिली आहे . आपल्यापैकी उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला आज आपल्यातील एक घटक राष्ट्रपती झाल्याचा निश्चितच सार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.

संविधानामध्ये सर्वांना समान संधी मिळणे अपेक्षित आहे .भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही संविधानामध्ये हीच बाब अपेक्षित होती, परंतु संविधान धोक्यात आहे असे ओरडायचे, लोकांची दिशाभूल करायची; परंतु संविधानात लिहिल्याप्रमाणे वागायचे नाही. प्रत्यक्षात कृती वेगळीच करायची हे काँग्रेसचे धोरण आहे. संविधानाला अपेक्षित कृती करत  मोदीजींनी संविधानाला अपेक्षित व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित कृती आज केल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे केन्द्र सरकार अठरा पगड जातींना न्याय देऊन सबका साथ सबका विकास करत असल्याचे त्या म्हणाल्या.

असा पार पडला अभूतपूर्व सोहळा!

महामहिम द्रौपदीजी मुर्मु यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल आमदर श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून चिखली शहरात आयोजित करण्यात आलेला हा अभिनंदन सोहळा अभूतपूर्व असाच ठरला .  महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या आनंदोत्सवास सुरुवात झाली. अभिनंदन सोहळा मिरवणूक सुरु असताना सहभागी महिलांनी हातात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु , पंतप्रधान नरेन्द्र मोदी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  आमदार सौ. श्वेताताई महाले यांचे कटआऊट हातात घेतलेले होते. फटाके फोडून आणि ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा पार पडला. या अभिनंदन सोहळ्यासाठी मेळघाट येथील ५०  आदिवासी बंधू आणि भगिनीच्या पथकाला खास करून बोलाविण्यात आले होते. या पथकाने महाराणा प्रतापसिंह चौकापासून परंपरागत आदिवासीं नृत्य सादर करुन चिखली शहर वासियांचे मन वेधून घेतले होते . आदिवासी बंधू भगिनी यांनी त्यांचा पारंपरिक वेष परिधान केलेला होता . तसेच ढोलकी, बासरी , आणि इतर आदिवासी वाद्य वाजवून त्यांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सुद्धा आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

सर्वव्यापी अन् सर्वस्पर्शी उपस्थिती..
या अभिनंदन सोहळ्यासाठी चिखली विधानसभा मतदार संघातील मातला , सिंदखेड, पांगरी , हीवरा नाईक, किन्ही नाईक वैरागड या व इतर आदिवासी बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते .यावेळी डॉ. संध्याताई कोठारी, डॉ आरतीताई पालवे,  मनीषाताई सपकाळ,  प्रियांका कंजदेकर, यांची समयोचीत भाषणे झाली  , तसेच मंदाकिनीताई गवई,सुलतानबी, माईताई भवर, सुनंदाताई  शिनगारे, सौ सिंधुताई तायडे, सौ सुनिताताई भालेराव, सौ द्वारकाताई भोसले, सौ निताताई सोळंकी, सौ वैशालीताई शेळके, राधाताई कापसे ,जेष्ठ नेते सतिशजि गुप्त, रामकृष्ण शेटे , प्रेमराज भाला , रामदास  देव्हडे, पंडितराव देशमुख,कृष्णकुमार सपकाळ, अंकुशराव पाटिल,सुहास शेटे,संतोष काळे, पंजाबराव धनवे, डॉ राजेश्वर उबरहांडे, प्रा. वीरेंद्र वानखडे, बंडू अंभोरे,शिवराज पाटिल, गोविंद देव्हडे, शेख अनिस भाई,संजय अत्तार, सागर पुरोहित, संदीप लोखंडे,मुकेश पडघान, विजय खरे, शंकर देशमाने, दिलीप सिरसाठ, सुदर्शन खरात, योगेश झगडे, शैलेश सोनुने,एकनाथ सोळंकी, सिद्धू ठेंग, सागर पवार, छोटू कांबळे, मनीष गोधणे, शाम वाकदकर, गजेंद्र म्हस्के, केवल्य कुलकर्णी व असंख्य नागरिक उपस्थित होते.