आमदार श्वेताताई अमेरिकेवरून भारतात परतल्या; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले एका अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिका दौऱ्यावर होत्या. २० दिवसांचा अभ्यास दौरा आटोपून आ. श्वेताताई आज, ५ डिसेंबरला चिखली विधानसभा मतदारसंघात परतत आहेत. आज, सायंकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

पाश्यात आणि मध्य भारतातील महिला आमदारांच्या पुढच्या पिढीचे सशक्तिकरण या विषयावर आयोजित विशेष सत्रासाठी आमदार श्वेताताईंना अमेरिका भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते.१३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान हे सत्र पार पडल्या . यासाठी आ. श्वेताताई ११ नोव्हेंबरला अमेरिकेसाठी रवाना झाल्या होत्या. आज,५ डिसेंबरला रात्री त्या चिखलीत पोहचनार आहेत. आज,छत्रपती संभाजी नगर विमानतळावर आ. श्वेताताईंच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते पोहचले होते.