फेटा बांधून आमदार श्वेताताई विधिमंडळात! जनतेचा विश्वास असल्याने बहुमत सिद्ध करण्याचा विश्वास ! आता नव्या युतीची नांदी..!
Jul 3, 2022, 11:30 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आज फेटा बांधून विधिमंडळात पोहचल्या. भाजपा - शिवसेना युतीचे सरकार आज विधिमंडळात बहुमत सिद्ध करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कालच आमदार श्वेताताई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती हे विशेष..!
मेहकरचे आ.संजय रायमुलकर यांच्यासोबतचा विधिमंडळातील एक फोटो आ. महाले पाटील यांनी स्टेटस ला ठेवला. शिंदे - फडणवीस सरकारने आज बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्या मंत्रिमंडळात भाजपच्या विदर्भातील एकमेव महिला आमदार असलेल्या श्र्वेताताई यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तूर्तास आजतरी आ. श्वेताताई आणि आ.संजय रायमुलकर यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसतोय..! ही युती म्हणजे आता विकासाची नांदीच असेल अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.