आ.संजय गायकवाड यांनी नाकारली वाय प्लस सुरक्षा! पण......!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना आ.संजय गायकवाड १८ दिवसांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर काल बुलडाणा शहरात आले. शिवसैनिकांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. आ. गायकवाड यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला आणि मतदारसंघातील प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घटी घेत कामाला सुरुवातही केली. विशेष म्हणजे आ. गायकवाड यांना शासनाच्या आदेशानुसार सध्या वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मात्र आ. गायकवाड यांनी ही सुरक्षा नाकारली होती.

जिल्ह्यात आणि मतदारसंघात प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. जिल्ह्यातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. आम्ही हिंदुत्वासाठी केलेल्या उठावाला जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे अनुचित प्रकार होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आपल्याला सुरक्षा नको असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून सुरक्षा पुरवण्याचा सूचना आल्याने पोलिसांनी सुरक्षा पुरविली असल्याचे आ. गायकवाड बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले.