बुलडाणा पालिकेची निघाली आरक्षण सोडत! ओबीसींसाठी 8 जागा आरक्षित!!
 

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुप्रिम कोर्ट व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ओबीसी, ओबीसी( महिला) व सर्वसाधारण ( महिला) प्रवर्गाचे आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यानुसार ओबीसी साठी 8 जागा आरक्षित ठरल्या आहे.

पालिकेच्या सभागृहात आज 28 जुलैला सकाळी 11 वाजता एसडीओ राजेश्वर हांडे व मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत प्रक्रियेला प्रारंभ झाला. यासाठी सुधीर दलाल, साठे, प्रमोद सुस्ते यांनी सहकार्य केले. पालिकेच्या 15 प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.


प्रभात एक अ -अनुसूचित जाती महिला ब- सर्वसाधारण. प्रभाग दोन अ -ओबीसी महिला ,ब- सर्वसाधारण. प्रभाग तीन अ -ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला. प्रभाग चार अ- ओबीसी महिला, ब -सर्वसाधारण. प्रभाग पाच अ -ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण.  प्रभाग सहा अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण. प्रभाग सात अ- अनुसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण. प्रभाग आठ अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण. प्रभाग नऊ अ - अनुसूचित जाती, ब -सर्वसाधारण महिला. प्रभाग 10 अ- सर्वसाधारण महिला, ब -सर्वसाधारण. प्रभाग 11 अ- ओबीसी, ब -सर्वसाधारण महिला. प्रभात 12 अ -ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण. प्रभाग तेरा अ -अनुसूचित जाती,
ब -सर्वसाधारण महिला. प्रभात 14 अ- ओबीसी, ब -सर्वसाधारण महिला. प्रभात 15 अ -ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला.