गोडसे आणि मनुवादी विचार संपविण्याचा लढाईत सहभागी व्हा! महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी धिरज लिंगाडे यांनाच पहिल्या पसंतीचे मत द्या!

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे पदवीधरांना आवाहन

 
चिखली:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० जानेवारीला विधानपरिषदेच्या अमरावती  पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. योगायोगाने महात्मा गांधीजींची पुण्यतिथी त्याच दिवशी आहे. गोडसे आणि मनुवादी विचार संपविण्याची ही लढाई असून ३० जानेवारीला धिरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष राहुल  बोंद्रे यांनी केले आहे.

रज लिंगाडे यांच्या अनेक उत्कृष्ट शिक्षण संस्था आहेत, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात लिंगाडे यांचे मोठे योगदान असून व्यवस्थापनाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. पदवीधरांच्या अनेक समस्या आहेत. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारी, एमपीएससी चा अचानक बदलेला अभ्यासक्रमाचा पॅटर्न या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व पदवीधरांना न्याय देण्याचे काम धिरज लिंगाडे सक्षमपणे करतील हा विश्वास असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.