वटवृक्षाच्या सावलीतील आ. रायमुलकरांना कामाख्या देवी पावणार का? मंत्रिपदाचा मेळ जमेल का..?
"जो बोलता नही,वो करके दिखाता है" असा डायलॉग अनेकदा बोलल्या जातो. अनेक लोकांसाठी हा डायलॉग लागू होत असला तरी आ. रायमुलकर मात्र त्याला अपवाद आहेत. आ. रायमुलकर बोलतही नाहीत आणि काही करतही नाहीत अस त्यांच्याबाबतीत मतदारसंघात बोलल्या जात.आमदारकी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष त्यांना करावा लागला नाही(तेवढं ते जातीच्या दाखल्याचा वगळता) जे काही मिळालं ते सहजरीत्या अन् अर्थातच खा. जाधवांमुळे. त्यामुळे स्वतःला जे सहज मिळालं ते मिळवताना आपल्या मुलाला कष्ट उपसावे लागू नयेत याची काळजी मात्र आ. रायमुलकरांनी घेतलेली दिसते. अपघाताने राजकारणात आलेले रायमुलकर आता स्वतःच्या मुलाचीही "सोय" करून ठेवत असल्याची चर्चा मेहकरात आहे...
बर ते जाऊद्या ...मुद्दा असा आहे आ. रायमुलकरांना मंत्रीपद मिळेल का?, तिसऱ्यांदा आमदार म्हणून ( खा. जाधवांमुळे) निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना मंत्रीपद मिळेल असे वाटत होते, मात्र तेव्हा त्यांच्या वाट्याला काही आल नाही. त्यानंतर हिंदुत्वाच्या(खरचं का?) मुद्द्यावर काडीमोड घेऊन आ. रायमुलकर एकनाथ शिंदेसोबत गेले. आता तिथे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही जमल नाही मात्र पुढच्या विस्तारात आपला मेळ जमावा अस रायमुलकरांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच की काय, खा.जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावून घाईघाईत ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेच. आता त्यांना देवी पावते का हे पुढच्या काळात कळेलच....!