योगेंद्र गोडेंच्या बंगल्यात रात्रीस खेळ चाले..!! वाचा गोष्ट "त्या" रात्रीची....
भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे म्हणजे भलामाणूस..ना कुणाच्या अध्यात,ना कुणाच्या मध्यात..पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडायची हे गोडेंचे काम. त्यामुळेच की काय पक्षाच्या जबाबदारीचे ओझेही कायम योगेंद्र गोडे यांच्यावरच असते. पक्षाचे प्रदेश पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील नेते पक्षाच्या कामानिमित्त बुलडाण्यात येणार म्हणजे आयोजन ,नियोजन गोडे यांच्याकडेच असणार हा तसा अलिखित नियम झालाय. आणि विशेष म्हणजे गोडे नियोजनात कोणतीही कसर ठेवीत नाहीत. अर्थात ऐन वेळी त्यांच्याच पक्षातील काही स्वयंघोषित लोकनेते चमकोगीरी करण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही गोडेंवर त्यांचा काही परिणाम होत नाही. पक्ष सांगेल ती पूर्वदिशा या पद्धतीने गोडे काम करीत असतात, तर असो..
त्या रात्री म्हणजे २१ जानेवारीच्या रात्री प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रात्री साडेअकराला बुलडाण्यात पोहचले. योगेंद्र गोडे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आ.डॉ.कुटे, आ.फुंडकर, योगेंद्र गोडे यांच्यात उशिरापर्यंत गप्पा रंगल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्ह्यातील पक्ष बांधणी यावर चर्चा झाली. आता एवढे रथी महारथी या बैठकीत असल्यावर जिल्ह्यातील आगामी निवडणुकीवर रणनीती ठरली नसेल तर नवलच..पण रणनीती गुप्त असल्यामुळे जे ठरल ते त्या रात्री गोडेंच्या निवासस्थानी हजर असलेल्या मोजक्या लोकांनाच माहीत. मात्र गोडेंनी केलेल्या स्वागताने, आदरातीथ्याने बावनकुळेही भारावून गेले. "त्या" रात्री भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, युवामोर्चाचे सोहम झाल्टे आणि मोहित भंडारी हेसुद्धा गोडेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.