अर्धे हवेत, अर्ध्यांची निघाली हवा !! परिणाम जिप गटांच्या आरक्षणाचा
Updated: Jul 28, 2022, 18:25 IST
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मार्चमध्येच मुदत संपलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या लढतीचा मुहूर्त लवकरच नक्की होईल अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रामुख्याने ग्रामीण भागात मुहूर्ताची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. याचा प्रत्यय आज काढण्यात आलेल्या गट निहाय आरक्षणाच्या हाऊस फुल्ल सभेने आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन आज 28 ला माजी व भावी सदस्य, माजी सभापती, व त्यांच्या शेकडो समर्थकानी 'ओव्हर फ्लो' झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते, बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 2 च्या ठोक्याला सोडतीला प्रारंभ झाला.
निवडणूक कक्षाचे राम जाधव, नितीन रिंढे पाटील, जीवन ढोले, राजेंद्र एंडोले, मनीषा पडोळ, स्वाती पुरी याच्या चमूने बँक स्टेज ची जवाबदारी सांभाळली. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी असलेल्या अक्षरा नितीन पडोळ हिच्या शुभहस्ते ईश्वरी चिठ्टी काढण्यात आल्या. तिचा कौल अनेकांना शेकडो इच्छुकांचे भाग्याचा फैसला करणारा ठरला.