पालकमंत्री गुलाबराव पाटील आज, जिल्ह्यात! जिल्हा नियोजन समितीची होणार बैठक; तिसऱ्या दौऱ्यापासून विकासाचा श्रीगणेशा..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील कालपासून बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल, रात्रीच ते शेगाव मुक्कामी दाखल झाले होते. दरम्यान आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहेत. याआधी पहिल्या दौऱ्यात त्यांनी केवळ राजकारण केले होते. जिल्ह्यात तीन राजकीय सभांना संबोधित करून ते परतले होते. त्यानंतर दुसऱ्या दौऱ्यात मोताळा तालुक्यात एका सामाजिक मेळाव्याला हजेरी लावून ते परतले होते. त्यानंतर आज, १० नोव्हेंबरला ते तिसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मेहकर तालुक्यात काही ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते मात्र आचारसंहिता लागल्याने ते भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर गुलाबराव पाटील जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीसोबत चर्चा करणार आहेत.