Good News! चिखली नगरपालिका हद्दवाढीस मिळाली अंतिम मान्यता; आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या गत्‌ दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.त्‍यांनी मंत्री शिंदे यांचे आभारही मानले आहेत.

हद्दवाढीचे सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतरही अंतिम मान्यता दिली नसल्याने चिखली शहराची हद्दवाढ थांबलेली होती. त्यामुळे अंतिम मान्यता देण्याची मागणी नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी लावून धरली होती. त्‍यांनी नगरविकास मंत्री, प्रधान सचिवांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना आदी संसदीय आयुधे वापरली.

अखेर त्‍यांच्या लढाईला यश मिळाले. हद्दवाढीच्या  प्रस्तावास अंतिम मान्यता मिळत नसल्याने वाढीस निधीपासून चिखली नगरपरिषदेला मुकावे लागत होते. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे शक्य होत नव्हते. नगरपरिषदेचे क्षेत्रफळ ७.८८९ चौरस किलोमीटर आहे. सन १९८१ च्या जगगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या २७६०६ एवढी होती तेव्हापासून चिखली शहराची हद्दवाढ झालेली नव्हती. सन २०११ रोजी झालेल्या जणगणने नुसार चिखली शहराची लोकसंख्या ५७,८८९ एवढी आहे. नगरपरिषद चिखली हद्दीबाहेर झपाट्याने विस्तार होत असून, निवासी व वाणिज्य क्षेत्र निर्माण होत आहे.