शेतकरी नेत्याला मिळणार हक्काचा आधुनिक रथ! शेतकरी, कष्टकरी व मित्रांच्या गोतावळ्याने केली वर्गणी!! बुलडाण्यात रविवारी अभूतपूर्व कृतज्ञता सोहळा रंगणार: बुलडाणा अर्बन रेसिडनसी हजारो चाहत्यांनी फुलणार
अश्या या नेत्याचा आजवरचा जीवन प्रवास जसा हटके आहे तसाच त्यांची आजवरची आधुनिक मोटारीतील ' घोडदौड ' ही मैत्रीपूर्ण उधारीवरच पार पडली असे म्हणता येईल. आजवर त्यांनी केलेला प्रवास असाच स्नेही, मित्र, आप्तेष्ट यांच्या वाहनावरच पार पडला. मात्र १२ जून रोजी ते स्वतःच्या गाडीचे मालक ठरणार हाय!
रविवारी बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी येथे एक अविस्मरणीय सोहळा पार पडणार आहे. एव्हरग्रीन रविकांत तुपकर यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शेतकरी योद्ध्यासाठी तमाम शेतकरी, कष्टकरी व मित्र परिवाराने लोकवर्गणीतून एक चारचाकी वाहन घेतले आहे. सदर वाहन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शेतकऱ्यांच्या साक्षीने रविकांत तुपकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे.
१२ जून रोजी बुलडाणा अर्बन रेसीडेन्सी येथे सायंकाळी सहा वाजता या अविस्मरणीय कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ,ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ राहणार आहेत. आदर्श गाव हिवरे बाजाराचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज या दिगगजांच्या हजेरीने सोहळ्याला चार चांद लागणार आहे. विशेष उपस्थिती राहणार आहे तसेच आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे सचिव ओमप्रकाश शेटे, प्रसिद्ध लेखक संदीप काळे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय, अभूतपूर्व ठरणारच आहे. हे पाहण्यासाठी समस्त चाहत्यांनी सोहळ्याला आपली हजेरी लावून आपलीही कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यकच आहे, नाही का?