डॉ दिपक लद्धड म्हणाले,मी शरीराचा कर्करोग दुरुस्त करतो, योगेंद्रजींनी समाजाचा कर्करोग दुरुस्त करावा! योगेंद्र गोडेंच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात पार पडले मोफत कर्करोग तपासणी शिबिर!

उद्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन
 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने शरीराचा कर्करोग दुरुस्त करतो मात्र माझे मित्र योगेंद्रजींनी समाजाचा दूर करावा. भ्रष्टाचार , व्यसनाधीनता , अज्ञान आणि अस्पृश्यता हा समाजाचा कर्करोग आहे. हे दूर करण्यासाठी योगेंद्रजी पुढाकार घेत आहेत. आजाराचे लवकर निदान होणे जसे आवश्यक आहे तसे राजकीय जीवनात सुद्धा योग्य आणि अयोग्य याचे निदान लवकर व्हायला पाहिजे असे प्रतिपादन बुलडाणा येथील सुप्रसिध्द  डॉक्टर दिपक लद्धड यांनी केले. भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यालयात  आज, २४ मे रोजी आयोजित मोफत कर्करोग तपासणी शिबिरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी योगेंद्र गोडे, विजयराज शिंदे, विजयाताई राठी, सिद्धार्थ शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

बुलडाणा शहर भाजपा व जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगेंद्र गोडे यांच्यावर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वांच्या आशीर्वादाने व शुभेच्छांमुळे शारीरिक व मानसिक बळ मिळते. यापुढेही सर्वच सामाजिक क्षेत्रात सेवेसाठी तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी योगेंद्र गोडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी तर सूत्रसंचालन  भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे यांनी केले. योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मोताळा येथे सुद्धा मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय बुलडाणा येथे उद्या शेतकरी मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पजांब डख मार्गदर्शन करणार आहेत.

 कार्यक्रमाला  दिपक वारे, गोविंद सराफ, अरविंद होंडे, सुभद्राताई इंगळे, पद्मनाथ बाहेकर,  युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, वर्षाताई पाथरकर, आसिफ सय्यद, रंजनाताई पवार,पंडितराव सपकाळ, प्रितेश बेदमुथा,सचिन टेम्भिकर, प्रा.प्रभाकर वारे,नितीन बेंडवाल,प्रदीप बेगाणी,हर्षल जोशी,नारायण तोंडीलायता, राजेश पाठक,शोभाताई ढवळे,सचिन जोशी,नितीन श्रीवास,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर,भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी ,शरद जैन,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश पाटील,प्रदीप सोनटक्के,जैन सोशल मीडिया प्रमुख तेजस भंडारी,उमेश दळवी प्रकोष्ट अध्यक्ष शुभम कोठारी,श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.