दिवठाणा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; खा. प्रतापराव जाधवांचा शब्द ! गावकऱ्यांनी खा.जाधवांचा वाढदिवस केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा; कसा ते वाचा...!
Updated: Dec 3, 2022, 13:32 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात उत्साहात साजरा केला. दरम्यान चिखली तालुक्यातील दिवठाणा येथेही खा. जाधव यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गजाननसिंह शंकरबाबा मोरे मित्र मंडळ, ग्रामपंचायत देवठाणा च्या वतीने खा. प्रतापराव जाधव यांची भव्य लाडू तुला करण्यात आली. यावेळी अनेक तरुणांनी खा. प्रतापराव जाधवांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना युवा शाखा व ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दिवठाणा गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजाननसिंह शंकरबाबा मोरे यांनी, सूत्रसंचालन सचिन मोरे तर आभार योगेश मोरे यांनी मानले.