जिल्हावसियांनो नो टेन्शन! खासदार प्रतापराव जाधवांनी सांगितलं खामगाव जालना रेल्वेमार्गाच खर खर सत्य! रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंच्या "त्या" विधानाबद्दल म्हणाले...
२००९ च्या आधी खामगाव जालना रेल्वेमार्गाची केवळ मागणी होती, मात्र आपण पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर संसदेत या मागणीला वाचा फोडल्याचे खा.जाधव यांनी सांगितले. खामगाव जालना रेल्वेमार्गाची अंतिम लाईन तयार झालेली आहे.त्यात कुठे कुठे रेल्वेस्टेशन होणार आहेत हेसुद्धा फायनल झाले आहे. एकूण १६ स्टेशन पैकी १२ स्टेशन बुलडाणा जिल्ह्यात तर ४ स्टेशन जालना जिल्ह्यात होणार असल्याचेही खा.जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी खा.जाधव यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गाचा संपूर्ण नकाशाच दाखवला. अंतिम डीपीआर आठ ते दहा दिवसांत रेल्वेबोर्डाकडे सादर केला जाईल. हा केवळ केंद्र सरकारचा विषय नसून राज्य सरकारला सुद्धा एकूण खर्चाचा ५० टक्के वाटा उचलावा लागणार आहे, त्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून याआधीच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला असल्याचे खा.जाधव यांनी स्पष्ट केले.