दादांनी पाळली घड्याळाची" वेळ! जिल्ह्यात दाखल! जिजाऊचरणी नतमस्तक..!;तगडा पोलीस बंदोबस्त

 
सिंदखेडराजा ( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वक्तशीपणा कशाला म्हणतात याचे उदाहरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दाखवून दिले. पक्षाचे चिन्हच "घड्याळ" असल्याने ते अगदी नियोजन वेळेवर मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दाखल झाले. औरंगाबाद वरून निघालेले त्यांचे हेलिकॉप्टर साडेनऊ ला शिवतीर्थावर पोहचले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी त्यांचे स्वागत केले.

अजितदादांच्या दौऱ्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिंदखेडराजा नगरीत पोहचल्यानंतर अजितदादा पवार राजमाता  जिजाऊंच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले. आज ऐतिहासिक स्थळांची ते पाहणी करणार आहेत.  त्यानंतर दुपारी २ वाजता सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभागृहात ते विकासमकांचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ते हेलिकॉप्टरने जळगाव जामोदसाठी प्रस्थान करतील . संध्याकाळी ७ वाजता जळगाव जामोद येथील एसकेके कॉलेजच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. या सभेला राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे देखील संबोधित करणार आहेत. या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.