पोळ्याला खामगावात राडा! पोलिसांच्या कारवाई विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज खामगाव बंद! आमदार फुंडकरांचा "तीन" पोलीस अधिकाऱ्यांवर रोख! म्हणाले त्यांना आधी बदला ते फक्त एसीत बसून...
पोळा सणासाठी हजारोंचा जमाव जमत असताना पोलिसांनी केवळ होमगार्डचा बंदोबस्त लावला होता. नीट बंदोबस्त झाला असता तर ही घटना घडली नसती. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे तीन अधिकारी एसीत बसून शहरातील सर्वसामान्य मुलांना आरोपींच्या पिंजऱ्यात टाकत असल्याचा आरोप आ. फुंडकरांनी यावेळी केला.
खामगावात गणेशोत्सव व इतर सण शांतताप्रिय वातावरणात पार पाडण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी व तीन पोलिस अधिकाऱ्यांना शहराबाहेर पाठवावे अशी मागणी सुद्धा आ. फुंडकरांनी केली. पोळ्याला घडलेल्या घटनेच्या व पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज, २९ ऑगस्ट रोजी खामगावकरांनी बंद मध्ये उस्फूर्तपणे सहभागी होऊन पोलिसांच्या दडपशहीचा निषेध करावा असे आवाहन शहरातील गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.