७ पालिकांच्या प्रभाग रचनांना आयोग व आयुक्तांची हिरवी झेंडी! ४० हरकती फेटाळल्या !!  आता ९ ला होणार प्रसिद्ध

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ७ पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनावर घेण्यात आलेल्या तब्बल ४० आक्षेप वजा हरकती फेटाळण्यात आल्या आहे! निवडणूक आयोग व विभागीय आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचनांना मान्यता दिली असून आता त्या  ९ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ७ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनावर  घेण्यात आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या समक्ष २३ मे रोजी सुनावणी घेण्यात आली.  चिखली वगळून अन्य ८ पालिकांच्या प्रभाग रचनावर मागील १० ते १४ मे दरम्यान नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या . बुलडाणा,  मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ११ ( एकूण २२ ) हरकती प्राप्त झाल्या. मेहकर, देऊळगाव राजा व खामगाव मध्ये प्रत्येकी ४ मिळून १२, शेगाव मध्ये ५ तर जळगाव जामोद मध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाली होती.  नांदुरा मध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाही
 
आयुक्तांची हिरवी झेंडी!

 दरम्यान जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी सुनावणी नंतर ४० हरकतींवर आपल्या अभिप्राय सह  ८ पालिकांच्या  प्रारूव रचनांचे प्रस्ताव सादर केले. जळगाव  व देऊळगाव राजा या ' क 'वर्ग पालिकांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त तर  बुलडाणा, शेगाव, नांदुरा, मलकापूर, खामगाव,या  पालिकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले. याला ६ जूनला संध्याकाळी   मान्यता देण्यात आली.  यापूर्वी ७ जूनला या रचनाची प्रसिद्धी करण्यात येणार होती. मात्र आयोगाने  आज दिलेल्या आदेशानुसार  आता ती ९ तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापाठोपाठ आता दीड दोन आठवड्यात  मतदार यादी कार्यक्रम जाहीर होईल, अशी दाट शक्यता आहे.