आ. संजय गायकवाड म्हणाले; विजयराज शिंदे आमदारकीसाठी हपापलेला माणूस! ते काहीही करू शकतात! 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड १८ दिवसानंतर आज मतदारसंघात परतले. बुलडाण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यात घडलेल्या सत्तांतराचा सगळा घटनाक्रम सांगितला. हा उठाव हिंदुत्वासाठी होता. ३५ वर्षांच्या संघर्षानंतर मला आमदारकी मिळाली मात्र हिंदुत्वासाठी मी आमदारकी तर अनेक शिवसेना आमदारांनी त्यांचे मंत्रीपद पणाला लावले असे आ. गायकवाड म्हणाले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांचे कट्टर विरोधक व सध्या भाजपात असलेले माजी आमदार विजय राज शिंदे यांचे आता काय असा प्रश्न विचारला  तेव्हा ते काहीही करू शकतात अशी टिप्पणी आ. गायकवाड यांनी केली.

मी त्यांचा डीपी बघितला, उद्धवसाहेबांचा होता..ते आमदारकीसाठी हपापलेले आहेत. आता ते काहीही करू शकतात. ते जर आमदारकी मिळविण्यासाठी वंचित मध्ये जाऊ शकतात तर ते काहीही करू शकतात असे आ. गायकवाड म्हणाले. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला भाजपचे महामंत्री डॉ. योगेंद्र गोडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा हे देखील उपस्थित होते. बुलडाणा भाजपच्या वतीने योगेंद्र गोडे यांनी आ. संजय गायकवाड यांचे स्वागत केले.