Breaking! मुकुल वासनिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; जिल्ह्यातील काँग्रेस नेते जयपुरात..!
सन २०१४ पासून राज्यसभेच्या उमेदवारीने वासनिकांना वेळोवेळी हुलकावणी दिली! यामुळे यंदाही त्यांचे आघाडीवर असताना पक्ष श्रेष्ठी त्यांच्यावर मेहेरबान झाले. यामुळे त्यांना राजस्थानातून का होईना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जयपूरला सपत्नीक पोहोचलेल्या वासनिकांनी आज ,३१ तारखेला दुपारी १ वाजताच्या सुमारास विधानभवनात आपला अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी यांनी सुद्धा नामांकन दाखल केले आहे. यावेळी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अशोक गेहलोत, युवानेते सचिन पायलट, विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी, वासनिकांच्या सुविध्य अर्धांगिनी रविना खुराणा- वासनिक या उपस्थित होत्या. यापूर्वी प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेश अध्यक्ष गोडासरा यांनी त्यांचे स्वागत केले तर महिला पदाधिकार्यांनी त्यांचे औक्षवन केले. नामांकनासाठी दूरवरच्या बुलडाणा येथून आलेले ऍड. विजय सावळे, जिल्हा नेते तुळशीराम नाईक यांनी वासनिकांचे अभिनंदन केले.
संजय राठोड एक दिवस अगोदरच दाखल..
दरम्यान प्रदेश काँग्रेसचे नेते संजय राठोड हे यानिमित्त कालच जयपूरला दाखल झाले होते. त्यांच्याशिवाय जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, काँग्रेस नेते संतोष आंबेकर, विजय अंभोरे, गणेश राजपूत आदी देखील रविवारी उशिरा जयपूरला डेरे दाखल झाले होते.