मोठी बातमी! चिखली तालुक्यात अंचरवाडी भोगावती या नवीन जिल्हापरिषद गटांचा जन्म!  भावी उमेदवारांत कही खुशी कही गम! वाचा कोणत्या गटात कोणती गावे..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकीयदृष्ट्या संवेदनशील व आक्रमक राजकारणासाठी  ओळखल्या जाणाऱ्या चिखली तालुक्यात एका वाढीव जिल्हा परिषद गटाची  भर पडली आहे. यामुळे गटांची संख्या ८ झाली असून पुनर्रचनेत भोगावती व अंचरवाडी या सर्कलचा जन्म झालाय! यामुळे आता ग्रामीण भागासह राजकीय क्षेत्रातील हालचालीना वेग येणार आहे.

यंदा  जिल्हा परिषद  सर्कलचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंचरवाडी जिल्हा परिषद गटातील मेरा खुर्द गणात देऊळगाव धनगर, मेरा खुर्द, मलगी, कोनड, भरोसा,रामनगर तर अंचरवाडी गणात शेळगाव आटोळ, अंचरवाडी, वसंतनगर, मंगरूळ, इसरूळ, मिसाळ वाडी, अमोना या गावांचा समावेश आहे. भोगावती असे नामकरण झालेल्या गटातील कोलारा गणात कोलारा, भालगाव, भानखेड, जांभोरा, येवता, चांधई, तांदुळवाडी, बेराळा तर भोगावती गणात गोदरी, पळसखेड दौलत, भोकर, साकेगाव, खोर,  माळशेंबा, भोगावती, तांबुळवाडी ही गावे समाविष्ट आहे.

उंद्री गटातील करवंड गणात करवंड, श्रीकृष्ण नगर, डोंगरशेवली, बोराला, टाकरखेड हेलगा, हरणी, डासाळा तर उंद्री गणात उंद्री, किन्ही सवडत, कुसुम्बा, कुसूनबी, वैरागड, तोरणवाडा, जामदरी, मोहदरी, मेडसिंगा, असोला नाईक, वरदडा ही गावे आहे. ईसोली जीप गटातील ईसोली गणात मुंगी, ईसोली, धोत्रा नाईक, हिवरा नाईक, किन्ही नाईक, पिपरखेड, हराळखेड, कारखेड ,   ढुमा तर मंगरूळ नवघरे गणात बाभूळगाव , बाभूळगाव,  मंगरूळ नवघरे, सावंगी गवळी, नायगाव बुद्रुक, भोरसा भोरसी, धानोरी, सावरखेड बुद्रुक, साखरखेड खुर्द, गोंधनखेड ,डोंगरगाव, नायगाव खुर्द  ही गावे आहे.

 अमडापूर गटातील कव्हळा गणात कव्हळा, सावरखेड नजीक, दहिगाव, करणखेड, खामखेड, गोंधनखेड, महात्तमखेड, शेलसुर, शेलोडी, धोत्रा भनगोजी, धोडप, बेलखेड, कोटखेड, पळसखेड सपकाळ तर अमडापुर गणात अमडापूर व टाकरखेड मुसलमान, एनखेड ही 3 गावे आहे. शेलुद गटातील एकलारा गणात एकलारा, तेल्हारा, पाटोदा, मुंगसरी, बोरगाव काकडे, पांढरदेव, देवदरी, जांभरून, बोराखेडी, करतवाडी ही गावे आहे.

शेलुद गणात शेलुद, पळसखेड जयंती, उत्तरादा, शिंदी हराळी, सोमठाना, दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, खंडाळा  मकरध्वज, ही गावे आहे. सवना गटातील सवना गणात सवना, वळती, हातनी, किन्होळा, आंधई चांधई, बेलदरी तर केळवद गणात केळवद, मालगणी, सावरगाव डुकरे, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अंत्री कोळी, वाघापूर, ब्रम्हपुरी, गीरोला, कोलारी या गावांचा समावेश आहे. मेरा बुद्रुक गटातील गांगलगाव गणात खैरव,गांगलगाव , अंबाशी, रानअन्त्री, काटोडा, आमखेड, कवठळ रोहडा, मुरादपूर तर मेरा बुद्रुक मध्ये अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक, असोला बुद्रुक, चंदनपूर, मनुबाई , गुंजाळा ही गावे आहे.