BULDANA LIVE SPECIAL: बंडासाठी सैनिकांवर दडपण ? मोठ्या नेत्यांचे संपर्क अभियान ?? मात्र बहुसंख्य निष्ठावान कार्यकर्त्यांचा नकार : सूनावताहेत खडे बोल
शिवसेना विरोधात बंड पुकारणाऱ्या नेत्यांना विधिमंडळ व संसदीय मंडळात फूट पाडण्यात यश मिळाले. चाळीस आमदार व 12 खासदार बंडात सहभागी झाले. मात्र आता शिवसेना कुणाची आणि धनुष्य बाण कुणाचा ( कोणत्या गटाचा) यावरून वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 8 ऑगस्ट पर्यंत लेखी माहिती, पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. सभागृहात यशस्वी फूट पाडणाऱ्या व अलीकडे शपथ पत्राची कार्यवाही सुरू करणाऱ्या शिंदे गटाला संघटनेत ही उभी फूट पाडणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे अधिकृत पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे समजते. यामुळे नेत्यांनी फोनाफोनी करून जास्तीत जास्त पदाधिकारी आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न चालविले आहे.
मात्र यात तूर्तास तरी नेत्यांना फारसे यश मिळत नसल्याचे वृत्त आहे. अनेक जण फोन करणाऱ्यास खडे बोल सूनावुन आपण उद्धव ठाकरें सोबत असल्याचे ठणकावून सांगत आहे. तुम्हाला पक्षाने सर्व काही दिले असतानाही तुम्ही असं करायला नको होतं , तुमचा निर्णय तुमच्या पाशी आमचा आमच्यापाशी असे सांगायला देखील निष्ठावान सैनिक मागे पुढे पाहत नसल्याची चर्चा व्हायरल होत आहे.