BULDANA LIVE SPECIAL:  देऊळघाट सर्वात मोठा जिप गट! रायपूरचे  मतदार सर्वात कमी!! बुलडाणा तालुक्यात पावणे दोन लाखांवर वोटर्स..!!

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी  प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार संख्या हा निकष लक्षात घेतला तर  बुलडाणा तालुक्यातील 7 पैकी देऊळघाट हा सर्वात मोठा तर रायपूर हा सर्वात कमी मतदारसंख्येचा जिल्हापरिषद मतदार गट ठरणार आहे. 

तालुक्यातील देऊळघाट हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील गट आहे.  यामुळे उमेदवारांची निवडणुकीत दमछाक होतेच पण लहानसहान वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतात. त्यातच सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे. या गटात 30 हजार 389 मतदार असून हरकती नंतर  यात किंचित घट होऊ शकते.

यानंतर  अलीकडे सेनेचा बालेकिल्ला ठरलेल्या मासरूळ गटात 28 हजार 47 मतदार असून धाड मध्ये ही संख्या 27 हजार583 इतकी आहे. नव्याने गठीत ढाल सावंगी मध्ये 26 हजार 579, सावळा-सुंदरखेड मध्ये 26 हजार 30, साखळी मध्ये 25 हजार 72 तर रायपूर मध्ये ही संख्या 23 हजार 196 इतकी आहे. हरकतींनंतर यात घट होऊ शकते. तरीही तालुक्यातील गटांची मतदारसंख्या 23 ते 30 हजार या रेंज मध्ये राहणार आहे. 

महिलांचे लक्षणीय मतदान

 तालुक्यातील पुरुष स्त्री यांचे गुणोत्तर समाधानकारक असल्याने मतदारांचे प्रमाण देखिल समाधानकारक आहे.  पुरुष मतदार 98279 असून महिलांचे 88 हजार 616 मतदान आहे. यातील अंतर 9663 इतके असून इतरचे एकमेव मतदान आहे. मतदारांचा आकडा 1 लाख 86 हजार 896 इतका आहे.