BULDANA LIVE EXCLUSIVE: ओबीसींना 'सर्वोच्च' दिलासा! झेडपी, पंस, पालिकामधील आरक्षण कायम!! बुलडाणा झेडपीमध्ये 17 ते 18 जागा राखीव..!

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास कायम ठेवणाऱ्या ओबीसी बांधवांना आज 'सुप्रिम' दिलासा मिळालाय! आज, 20 जुलैला  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्था मधील आरक्षण पूर्ववत कायम ठेवण्याचा ऐतिहासिक आणि दिलासादायक निकाल दिला आहे. विस्तृत निकाल हाती आला नसला तरी बुलडाणा झेडपीच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय प्रवर्गाला 17 ते 18 जागा  आणि 9 पालिकांच्या लढतीत कमीअधिक 67 जागा ओबीसी साठी राखीव राहतील असा सध्याचा रागरंग आहे.
 

यापूर्वी धोक्यात आलेले आरक्षण तत्कालीन महा आघाडी सरकारने इम्पेरियकल डेटा, ट्रिपल टेस्ट आणि समर्पित अर्थात बाठिया आयोगाची स्थापना हे निकष पूर्ण केल्यावर पुन्हा मिळण्याची सुचिन्हे नजरेत आली. 11 जुलैला राज्य सरकारने सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकेनंतर राज्यातील 25 झेडपी आणि 92 पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने स्थगित केला. यामुळे ओबीसींना आरक्षण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली.

आणि मिळाल्या हक्काच्या जागा...!

 या पार्श्वभूमीवर आज घटनापीठाने आरक्षण कायम ठेवणारा निकाल दिला. याचा तपशील सध्या अप्राप्त असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इमाव प्रवर्गाला  27 टक्के आरक्षण हे एकूण आरक्षण 50 टक्केच्या मर्यादेत राहणार आहे. यामुळे ओबीसींना मोठ्ठा सुप्रिम दिलासा मिळाला.  दरम्यान बुलडाणा जिह्यापुरते सांगायचे झाल्यास , झेडपी मध्ये  27 टक्केच्या निकषांनुसार 18 जागा तर 50 टक्के मर्यादेच्या निकषावर 17 जागा राखीव राहणार असे तज्ज्ञांनी बुलडाणा लाइव्ह सोबत बोलतांना सांगितले. दुसरीकडे जिल्ह्यातील 9 पालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या पालिकांच्या 121 प्रभागांत 246 जागा आहेत. 27 टक्केच्या निकषावर कमीअधिक 68 जागा ओबीसी साठी आरक्षित राहतील असे या तज्ञांनी सांगितले.