BREAKING देवेंद्र फडणवीस आजच घेणार शपथ घेण्याची शक्यता!
Updated: Jun 30, 2022, 16:22 IST
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): महाराष्ट्रातल्या महाबंडामुळे काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आजच नवी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेचे ३९ आमदार फुटल्याने ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला.
आज,३० रोजी दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले असले तरी त्यांचे समर्थक आमदार अजूनही गोव्यात आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आल्यानंतर सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ३ वाजून ३५ मिनिटांनी ते देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाण्यासाठी निघाले.
तिथे आजच ते राज्यपालांजवळ सत्तास्थापनेचा दावा करून संध्याकाळी ७ वाजता राजभवनात छोटेखानी समारंभात शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी शिंदे गटातील सर्वच आमदार गोव्यावरून संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.