BREAKING! पालिका मतदार यादीवर हजारो हरकती!!यंत्रणा हैरान-परेशान ! अंतिम साठी मिळाली मुदतवाढ

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ८ पालिकांनी प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांवर हजारोंच्या संख्येने हरकती घेण्यात आल्याने पालिका प्रशासन घायकुतीला आल्याचे चित्र आहे. यामुळे पालिकांची अडचण लक्षात घेता अंतिम प्रसिद्धीला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाली असली आणि सरकार पूर्ण पणे कार्यरत झाले नसले तरी राज्य निवडणूक आयोग पालिका निवडणुकांची जय्यत पूर्वतयारी करीत आहे. प्रभाग रचना, आरक्षण करण्यात आल्यावर नुकतेच मतदार यादी कार्यक्रम घेण्यात आल्या.  जिल्ह्यातील ८ पालिका प्रसाशनानी मतदार यादी प्रसिद्ध केल्या. मात्र या याद्यांवर २१ ते २७ जून दरम्यान हजारोंच्या संख्येत हरकती, आक्षेप घेण्यात आले. एकट्या मेहकरात ४ हजाराच्या आसपास हरकती घेण्यात आल्या. पालिका उपाध्यक्ष जयचंद बाठिया यांनी आयोगाकडे आक्षेप नोंदविला आहे. 

आता मंगळवारी अंतिम प्रसिद्धी

 दरम्यान या हरकती व सूचनांचे योग्य निराकरण करून त्रुटीरहितअंतिम मतदार याद्या तयार करणे अशक्य ठरणार असल्याने आयोगाने  त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ५ जुलै रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. यानंतर  ९ तारखेला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे