BREAKING! सत्ता संघर्ष पराकोटीला असताना ४० आमदारांना ' आदर्श महादगलबाज पुरस्कार ' चे प्रातिनिधिक वितरण; कृषक समाजचा बुलडाण्यात धाडसी पुढाकार..!
याला कारण म्हणजे २९ जूनला दुपारी मीडियाच्या भरगच्च उपस्थितीत कृषक समाज मंडळाने गांधीगिरी करीत जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना एक आगळ्या वेगळ्या निषेधाचे निवेदन दिले . जिल्हाधिकारी हजर नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कक्षात आरडीसी दिनेश गीते यांनी हे निषेधवजा निवेदन स्वीकारले. हे निवेदन व सोबतचे प्रतिकत्मक आदर्श दगलबाज पुरस्कार राज्यपाल यांना पाठविण्यात येणार आहे. त्यांनी हा पुरस्कार पंचतारांकित मौज करणाऱ्याना प्रदान करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हा तर... कृषी द्रोह
हे बंड चोहोबाजुनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी द्रोह असल्याची भूमिका कृषक समाजच्या निवेदनाचा सार आहे. गणेश निकम केळवदकर, नंदूअप्पा बोरबळे, उमेश पाटील, नारायण वाणी, बाजीराव उन्हाळे, नितीन हिवाळे, समाधान ताजने, जितेंद्र कायस्थ यांनी हे शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारे निवेदन दिले आहे. सध्या लहरी पावसामुळे राज्यात कुठे पेरणीच रखडली तर कुठे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. खतांचा काळाबाजार, लिंक पद्धतीने विक्री, डीएपी गायब असणे, तणनाशक ची मनमानी विक्री यामुळे लाखो शेतकरी कोलमडून गेले आहे. अशा परिस्थितीत कृषी मंत्री मात्र गुवाहातील मौजमजा करीत आहेत यामुळे हा पुरस्कार देत असल्याचे निवेदनात नमूद आहे.