BREAKING!  जिल्ह्यातल्या ६ नगरपालिकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध;  २ पालिकांचा मुहूर्त हुकला! भावी उमेदवारांत धाकधूक..!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ८ पालिकांची अंतिम मतदार यादी  आज प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र  आज ,५ जुलै रोजी जिल्ह्यातील ६ पालिकांनी  यादी प्रसिद्ध  झाली असून २ पालिकांची अंतिम यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीची पूर्वतयारी जसजशी निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे तसे  नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांची धाकधूक वाढत आहे.

चिखली, खामगाव, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा व जळगाव नगर परिषदच्या अंतिम मतदार याद्या  आज प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र  बुलडाणा व मेहकर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीवर हजारो हरकती दाखल करण्यात आल्या. यामुळे मुदतवाढ मिळूनही आजच्या निर्धारित तारखेला त्या प्रसिध्द करणे अशक्य ठरले. यामुळे आता त्या ६ तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. 


यापूर्वी जिल्ह्यातील ८ पालिका प्रसाशनानी मतदार यादी प्रसिद्ध केल्या. मात्र या याद्यांवर २१ ते २७ जून दरम्यान हजारोंच्या संख्येत हरकती, आक्षेप घेण्यात आले. एकट्या मेहकरात ४ हजाराच्या आसपास हरकती घेण्यात आल्या. बुलडाणा पालिकेचा आकडा यापेक्षा जास्त होता. या हरकती व सूचनांचे योग्य निराकरण करून त्रुटीरहितअंतिम मतदार याद्या तयार करणे अशक्य ठरणार असल्याने आयोगाने  त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आज ५ जुलै रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. मात्र २ ठिकणी ते हुकले.