प्रतापगडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज! तिकडे काहीही ठरुदेत बुलडाण्याच्या जागेवर भाजपच सांगणार दावा..! मिशन लोकसभेसाठी तीन दिवस केंद्रीय मंत्र्याचा जिल्ह्यात मुक्काम...!!
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव लवकरच बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात खासदार जाधवांचे शक्तीकेंद्र (?) असलेल्या मेहकरातून होणार आहे. भाजपच्या लोकसभा कोअर कमिटीची बैठक सुद्धा मेहकर शहरातच पार पडणार असल्याचे समजते. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात फेरफटका मारल्यावर दुसऱ्या दिवशी चिखली आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सरपंच, अन्य लोकप्रतिनिधी यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. डॉक्टर, वकील,उद्योगपती,सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासोबत सुद्धा भूपेंद्र यादव संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या तिसरा दिवशी जळगाव जामोद, आणि खामगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमांना केंद्रीय मंत्री हजेरी लावणार आहेत. आता तुम्हीच सांगा वाचकहो भाजपचा एवढा सगळा खटाटोप सुरू असताना भाजप का बुलडाणा लोकसभेवर दावा सांगणार नाही?

बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो खरय ते...मिशन बुलडाणा लोकसभेचे अभियान ठरवून भाजपने त्यात आता बरीच आघाडी घेतलीय.राज्यातल्या ज्या १६ लोकसभा मतदारसंघांना भाजपने आपल्या अजेंड्यावर ठेवलेय त्यात बुलडाण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यासाठी आधी अनेक बैठका झाल्यात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि नुकतेच राज्यसभेवर गेलेले खा.अनिल बोंडे यांच्यावर बुलडाणा लोकसभेची महत्वाची जबाबदारी सोपवली आहे..त्यामुळे शिंदेगटात जाऊन लोकसभा वाचवत असल्याचे तात्पुरते समाधान खासदार जाधवांना मिळाले असले तरी ते समाधान अधिक काळ टिकण्याची शक्यता दिसत नाही. भाजप लवकरच मिशन बुलडाणा लोकसभा या अभियानाअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघात पाठवणार असून मंत्र्यांचा ३ दिवस मुक्काम असणार आहे.