BIG Breaking ! देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! आज संध्याकाळी शपथविधी

 
नवी मुंबईतील ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): एकनाथ शिंदे गटाच्या यांच्या समर्थन मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तविली जात असताना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले आहे.
आज राज्यपालांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाने सध्या सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.