BIG BREKING  अर्ध्या तासासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अन्  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या जिल्ह्यात..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या सत्ताकारणात चर्चेचा विषय ठरलेले महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या ७ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा त्यांच्यासोबत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

उद्याचा राज्यपालांचा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा केवळ गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राहणार आहे. दुपारी सव्वातीन ला राज्यपाल अकोल्यावरून निघतील, चार वाजता ते शेगावला पोहचतील. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर साडेचारला ते अकोल्याकडे प्रयाण करतील. राज्यपालांच्या व केंद्रीय मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शेगावात तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.