BIG BREAKING! पालिका आरक्षण सोडत जाहीर झाली पण ' ही ' पालिका सोडून ...

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुप्रिम कोर्टातील विशेष अनुमती याचिका आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर स्थगित करण्यात आलेली पालिकांच्या सोडतीचा नवीन मुहूर्त जाहीर झाला खरा मात्र यातून ' त्या' 92 पालिका वगळण्यात आल्या आहे. नवीन कार्यक्रमानुसार आता 28 जुलैला काढण्यात येणार आहे. यामुळे निवडणूक यंत्रणा व प्रशासन बुचकळ्यात पडल्याचे मजेदार चित्र आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 115 नगरपरिषद व 9 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. बुलडाणा जिल्ह्या पुरते सांगायचे झाल्यास यामध्ये बुलडाणा, मेहकर, खामगाव, नांदुरा, जळगाव, शेगाव व मलकापूर पालिकांचा समावेश आहे. मात्र यातून काही दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर झालेल्या देऊळगाव राजा पालिकेला वगळण्यात आले आहे. यापरिनामी आता 28 जुलैला केवळ वरील 7 पालिकांची सदस्य पदाची सोडत काढण्यात येईल.

पालिकांमध्ये पार पडणाऱ्या या सोडतीत,  ओबीसी, ओबीसी महिला, व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निर्धारित करण्यात येईल. या सोडतीवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. या सोडतीचा अहवाल जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करणार असून ते 4 ऑगस्ट पर्यंत त्याला मान्यता देणार आहे. त्या 5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.