BIG BREAKING! देऊळगाव राजा पालिकेचा १८ ऑगस्टला रणसंग्राम!! २१ जागांसाठी २२जुलै पासून नामांकन: आचारसंहिता लागू

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   महबंड,  सत्तांतर, मंत्री मंडळ विस्ताराची धामधूम सुरू असतानाच  राज्य निवडणूक आयोगाने  राज्यातील ९२ पालिकांचा निवडणूका जाहीर करून सर्वांनाच  जोरका धक्का धिरे सा दिला हाय! यामध्ये जिल्ह्यातील केवळ देऊळगाव राजा पालिकेचा समावेश आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असून नामनिर्देशन पत्र आयोगाच्या वेबसाईटवर २२ ते २८ जुलै दरम्यान उपलब्ध राहणार आहे. अर्ज स्वीकारण्याची हीच मुदत असून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान अर्ज सादर करता येणार आहे. या अर्जांची छाननी २९ ला करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी अपील नाही तिथे ४ ऑगस्ट पर्यंत माघार घेता येणार आहे. अपील असेल तिथे निकाल लागल्या पासून ३ दिवसात पण ८ ऑगस्ट पूर्वी कारवाई करावी लागणार आहे. माघारच्या शेवटच्या दिवशीच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ ऑगस्टला सकाळी ७:३० ते ५:३० वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार असून  १९ ला निकाल जाहीर होणार आहे.