आझाद गौरव पदयात्रेला मेहकर विधानसभा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद! काँग्रेसच्या एकजुटीचे दर्शन! देऊळगाव साकर्शा येथून यात्रेला प्रारंभ! ग्रामीण भागात तिरंगा उत्साह
पदयात्रेचे नेतृत्व करणारी ज्ञानेश्वर पाटील, श्याम उमाळकर, देवानंद पवार, लक्ष्मणराव घुमरे यांची तगडी टीम, सर्वत्र फडकणारे तिरंगे झेंडे, काँग्रेसचे झेंडे, आसमंत दणाणून टाकणाऱ्या घोषणा अन् प्रत्येक ठिकाणी होणारे जोशपूर्ण स्वागत असा या यात्रेचा जबरदस्त माहौल आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात ७५ किमी चा प्रवास ही यात्रा करणार असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी सांगितले.
आज, १० ऑगस्टला ही यात्रा गोमेधर, जानेफळ, मोसंबेवाडी, नायगाव दत्तापुर या गावांत जाणार आहे. नायगाव दत्तापुर येथे यात्रेचा मुक्काम राहणार आहे. या पदयात्रेत अनंतराव वानखेडे, भाई कैलास सुखदाने , मेहकर शहर अध्यक्ष पंकज हजारी, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव देशमुख, नाजीम कुरेशी, ओबीसी सेलचे संदीप ढोरे, माजी जीप सदस्य भास्करराव ठाकरे, विनायकराव टाले, प्रदीप बापू देशमुख ,विष्णुपंत पाखरे, नामदेव राठोड, निसार भाई, सरपंच संजय सुळकर, भारत आल्हाट, साहेबराव खंडारे, अरविंद जागृत, डॉ. मेहेत्रे, तुकाराम चव्हाण, दिलीप मोरे, भूषण काळे, सुखदेव ठाकरे यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा सर्वांचाच उस्फुर्त सहभाग असल्याने ही यात्रा काँग्रेसच्या एकजुटीचे दर्शन घडवत आहे एवढे मात्र नक्की...