BIG BREAKING जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा; थेट जनतेतून होणार सरपंच; १८ डिसेंबरला मतदान,२० डिसेंबरला उधळा गुलाल! डिसेंबरच्या थंडीत राजकारण तापणार
Nov 9, 2022, 19:11 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज,९ नोव्हेंबरला राज्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.१८ नोव्हेंबरला संबधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. ५ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. ७ डिसेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल.१८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होईल तर २० डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांमुळे ऐन थंडीत ग्रामीण भागाचे राजकारण तापणार आहे.