संतप्त आमदार संजय गायकवाड म्हणाले... याकूब मेनन च्या कबरीची सजावट करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा; विरोधक दहशतवादाचे समर्थकच असल्याचा केला आरोप

 
 बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्या दहशतवाद्याने मुंबईच्या लोकांच्या देहाच्या चिंधड्या उडवल्या त्याची कबर सजविने ही  खेदाची व मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे . यासाठी जवाबदार व्यक्तिविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. 

 पत्रकार भवनात पत्रकारांसोबत  चर्चा करताना त्यांनी ही मागणी  करताना गंभीर आरोपही केले.ज्या सरकारच्या काळात हे झालं म्हणून मला वाटत की आम्ही जे ४० आमदार वेगळे झाले , ते यामुळेच!  आम्ही हाच विचार मांडायचो की , दोन्ही काँग्रेस दहशतवादाचे समर्थन करणारे पक्ष आहे.  जर बाळासाहेब जिवंत असते आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर ही कल्पनाच  बाळासाहेबांनी ठोकरेंनी उडविली असती.

अशा प्रकारे देशद्रोहाच्या कबरेला कधीच सजवली गेले नाही पाहिजे ही बाळासाहेबांनी भूमिका घेतली असती....आपण पाहिलं की लादेन मारला तर त्याला समुद्रात फेकलं...अफजल गुरूला तुरुंगातच दफन केलं....पण अशा प्रकारे जर कुणी कबर सजविली असेल तर त्याच्यावर कारवाई करून त्याला देशद्रोही घोषित केलं पाहिजे, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली.