युतीच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी बुलडाण्यात टाकला "प्रकाश"! म्हणाले भाजपचा पत्ता कट, कारण..! शिवसेनेच्या बाबतीत म्हणाले...
यावेळी ते बोलत होते.
भाजपसोबत युती का नाही या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजप संविधान मानणारा पक्ष नाही, ते मनुस्मृती मानतात,त्यामुळे आमच्या ४० वर्षांच्या राजकारणात आम्ही भाजपसोबत गेलो नाही. भाजपसोबत युतीचा पत्ता आम्ही कट केला आहे असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकरी भरडला जात आहे. सोयाबीन, मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्याच्या हातून कापूस सुद्धा जाण्याची शक्यता आहे. अशावेळी आम्ही गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या अतिवृष्टीची मदत केल्याने आता आम्ही काही करू शकत नाही असे शासनाचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने अर्धवट निकाल दिला..!
राज्यात कारभार विचित्र आहे. या सरकारच काय होत? असच अजून चित्र आहे. सुप्रीम कोर्टाने अर्धवट निकाल दिला आहे, तो पूर्ण द्यावा असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजून निकाली निघाला नाही. अपात्रतेवरील स्थगिती उठली का? राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी बोलावणे योग्य होते का? असे अनेक गुंतागुतींचे मुद्दे आहेत.
त्यामुळे हे मुद्दे लवकर निकाली निघाली पाहिजेत. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या मराठी म्हणीची आठवण करून देत शिवसेना स्वतःला वाचविण्यासाठी पावले उचलण्यास कमी पडत आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात त्यांना विचारले असता भारत तुटा है क्या? असा सवाल त्यांनी केला.