स्वाभिमानीने मारले चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे! डोणगांवात निषेध, ठाण्यात तक्रार
Dec 13, 2022, 15:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मेहकर तालुक्यातील डोणगांव येथे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात आज १३ डिसेंबरला जोडे मारो आंदोलन करुन चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले. या वक्तव्याचा सार्वत्रिक निषेध होत असताना डोणगांव येथेही पडसाद उमटले. पाटील यांच्या बेजबाबदार विधानामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा, व अन्य मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डोणगांव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन केली आहे.