जिल्हाभरातून संदीप शेळकेंना ७० हजार पत्रे! वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयीन सचिवांची माहिती! पत्रात काय लिहिलंय...
Apr 7, 2024, 09:42 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना जिल्हाभरातून तब्बल ७० हजारांपेक्षा अधिक पत्रे प्राप्त झाली आहे. वन बुलढाणा मिशनचे कार्यालयीन सचिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ सुरू केली. जिल्ह्याच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी संदिप शेळके कटिबद्ध आहेत. त्यासाठी संदीप शेळके यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदिप शेळके यांनी लोकसभेसाठी अर्ज भरावा ही जिल्ह्यातील जनमानसाची भावना होती. जिल्ह्याच्या विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन त्यांनी जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमातून जिल्हावासियांना केले होते. त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या व संदीप शेळके यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला असे वन बुलडाणा मिशनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काय आहे पत्रात?
आपले सामाजिक काम मोठे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन आपल्याकडे आहे. तुमच्यासारखा माणूस संसदेत पोहचला तर जिल्ह्याचा कायापालट होईल. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणुकीत उभे रहावे, आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील असाच बहुतांश पत्रांचा आशय आहे.