EXCLUSIVE बुलडाणा विधानसभेत २१ जणांचे ३० अर्ज ! संभ्रम निर्माण करण्यासाठी आणखी एक जयश्री शेळके मैदानात?
Oct 30, 2024, 11:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. काल,२९ ऑक्टोबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २१ जणांनी ३० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून संजय गायकवाड तर महाविकास आघाडी कडून जयश्री सुनील शेळके या रिंगणात आहेत. याशिवाय विजयराज शिंदे, प्रेमलता सोनुने, सतीश पवार, प्रशांत वाघोदे यांनीदेखील आपापले अर्ज दाखल केले आहे..दरम्यान जयश्री शेळके नावाच्या आणखी एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केलेला असल्याने हा संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांचा डाव तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.काल, खुद्द शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील जाहीर सभेत हा सवाल उपस्थित केला होता...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी ने उमेदवार दिले आहेत. अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून आपले अस्तिव निर्माण करणाऱ्या शिवसेना नेत्या प्रेमलाता सोनोने या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या, मात्र त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी त्यांना स्वराज्य पक्षाची उमेदवारी दिली आहे. दरम्यान जयश्री सुनील शेळके यांनी उबाठा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत.
त्याशिवाय आणखी एक जयश्री मैदानात उतरल्या असून त्यांचे पूर्ण नाव जयश्री रवींद्र शेळके असे आहे..अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर असून तोपर्यंत कोण माघार घेते, कुणाचे अर्ज बाद होते यावरच मुख्य लढतीत कोण उतरते ते ठरणार आहे....