…म्‍हणून एकट्या महिलेला रेल्‍वेत दिली जात नाही पुरुषाशेजारी सीट!

नवी दिल्ली ः रेल्वे विभागाकडून प्रवाशांची विविध प्रकारे काळजी घेत असतो. विशेषतः प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेची तर अधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे आरक्षित डब्यात महिलांना आरक्षण देताना एकट्या दुकट्या महिलेशेजारी पुरुषाला किंवा या महिलेला पुरुषाशेजारी आरक्षण दिले जात नाही. भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आॅनलाईन तिकिट आरक्षणापासून सामान घरपोच करण्यापर्यंत अनेक सुविधा देत असते. प्रवासात बसल्या जागी खाद्यपदार्थ …
 

नवी दिल्ली ः रेल्वे विभागाकडून प्रवाशांची विविध प्रकारे काळजी घेत असतो. विशेषतः प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेची तर अधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे आरक्षित डब्यात महिलांना आरक्षण देताना एकट्या दुकट्या महिलेशेजारी पुरुषाला किंवा या महिलेला पुरुषाशेजारी आरक्षण दिले जात नाही.

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आॅनलाईन तिकिट आरक्षणापासून सामान घरपोच करण्यापर्यंत अनेक सुविधा देत असते. प्रवासात बसल्या जागी खाद्यपदार्थ पुरवते. याशिवाय अनेक सेवा- सुविधा आयआरसीटीसीकडून दिल्या जातात. त्याची अनेकांना माहिती नसते. महिलांना विविध कारणांमुळे एकटीने प्रवास करावा लागतो. अशा वेळी त्या प्रवाशी महिलेला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी आयआरसीटीसूकडून घेतली जाते. एखादी महिला रेल्वे तिकीट बूक करत असेल तर आयआरसीटीसी त्या महिलेला दुसऱ्या महिलेच्या शेजारचीच जागा देते. प्रवासादरम्यान पेचात्मक परिस्थितीत अनेकदा महिलांना पुरुषांमध्ये बसून प्रवास करावा लागतो. त्यामुळे महिलांची कुंचबणा होते. हे टाळण्यासाठी आयआरसीटीसी पूर्ण काळजी घेते. आता तर महिलांना रेल्वे प्रवासात कोणतीही अडचण आली तर त्या ट्विटरवरही तक्रार करायला लागल्या आहेत. रेल्वे त्याची दखल घेते. अनेकदा मंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले आहेत.