२५ तोळे सोने घेऊन विवाहिता निघाली पाकिस्तानी तरुणाला भेटायला
अमृतसर : प्रेमात पडलेली मंडळी कधी काय करतील काही सांगता येत नाही. त्यांना दुसर्या कुणाचे ऐकायचे नसते. स्वत:च्या मनासारखेच करायचे असते. शिवाय काहीही झाले तरी त्याची त्यांना पर्वा नसते. ओडिशातून एक विवाहित महिला चक्क तिच्या मुलीसह घरातून २५ तोळे सोने घेऊन फरार झाली. कशासाठी तर तेह एका पाकिस्तानी तरुणाला भेटून त्याच्याशी लग्न करण्यासाठी. बीएसएफच्या जवानांनी तिला सीमेच्या अलिकडे पकडल्याने ही घटना उघडकीस आली.
झाले असे की, ओडिशातील एक महिला विमानाने अमृतसरपर्यंत आली. तिच्यासोबत तिची मुलगीही होती. शिवाय तिच्याकडे २५ तोळे सोनेही होते. अमृतसरहून ती डेरा बाबा नानक साहिबमध्ये भारत पाक सीमेवर ती पोहोचली. करतारपूर कॉरिडॉरमार्गे ती पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात होती. पण कोरोनामुळे सध्या हा कॉरिडॉर बंद असल्याने तिची कोंडी झाली. लहान मुलीसह महिला असल्याने बीएसएफच्या जवानांनी तिची विचारपूास केली. त्यानंतर ओडिशातील तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती पाकिस्तानातील एका युवकाला भेटण्यासाठी निघाली होती. दोन वर्षांपूर्वी तिने तिच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड केला होता.त्यातून तिची मोहम्मद वकार नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली. दोघांनी अनेकदा व्हिडिओ चॅटिंग केले. त्यानंतर ती महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली व त्यांनी लग्न करण्याचे ठरविले व त्यासाठी ती तिचा सुखी संसार मोडून घरच्यांना धोका देऊन सीमेपार मित्राला भेटायला निघाली होती.