हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा : केवळ मंदिरात गळ्यात हार टाकल्याने होत नाही लग्न!

ग्वाल्हेर : केवळ मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार टाकल्याने लग्न होत नाही. त्यासाठी विधी पूर्ण करावे लागतात, असे उच्च न्यायाल्याने म्हटले आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वाचा निर्वाळा दिला. आर्य समाज मंदिरात लग्न केल्यानंतर सुरक्षा मिळवण्यासाठी जोडप्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. १६ ऑगस्ट रोजी या जोडप्याने ग्वाल्हेरच्या लोहा मंडी …
 

ग्वाल्हेर : केवळ मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार टाकल्याने लग्न होत नाही. त्यासाठी विधी पूर्ण करावे लागतात, असे उच्च न्यायाल्याने म्हटले आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वाचा निर्वाळा दिला. आर्य समाज मंदिरात लग्न केल्यानंतर सुरक्षा मिळवण्यासाठी जोडप्याने कोर्टात याचिका दाखल केली होती.

१६ ऑगस्ट रोजी या जोडप्याने ग्वाल्हेरच्या लोहा मंडी गेट येथील मंदिरात प्रेमविवाह केला होता. त्यानंतर नातेवाईक तक्रारी करत आहेत व धमक्या देत आहेत. त्यामुळे आमचे वैवाहिक संबंध दृढ करण्यासाठी सुरक्षा द्यावी, अशी मागणी जोडप्याने केली होती. मात्र कोण धमक्या देत आहे, कुणापासून धोका आहे, हे याचिकेत नमूद नाही. जिवाला धोका असेल तर आधी पोलिसांत जा. तिथे मदत मिळाली नाहीत तरच कोर्टात या, असेही न्यायालयाने म्हणत याचिका फेटाळून लावली आहे.