राष्ट्रीय बातमी : बायकोच्‍या फिरण्यावर नजर ठेवण्यासाठी लढवली शक्कल; बायकोला कळल्यावर वाचा काय झालं…

गुरुग्राम : डॉक्टर बायको कुठे कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी नवऱ्याने अजबच शक्कल लढवली. मात्र आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी नवरा काय काय करतो हे जेव्हा बायकोला कळाले तेव्हा तिला धक्काच बसला अन् तिने थेट पोलीस ठाणे गाठून नवऱ्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आल्याची तक्रार दिली. तक्रारदार महिला डॉक्टर आहे. कारमध्ये बसलेली असताना तिच्या हातातून मोबाइल पडला. मोबाइल …
 

गुरुग्राम : डॉक्टर बायको कुठे कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी नवऱ्याने अजबच शक्कल लढवली. मात्र आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी नवरा काय काय करतो हे जेव्हा बायकोला कळाले तेव्हा तिला धक्काच बसला अन्‌ तिने थेट पोलीस ठाणे गाठून नवऱ्यामुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आल्याची तक्रार दिली.

तक्रारदार महिला डॉक्टर आहे. कारमध्ये बसलेली असताना तिच्या हातातून मोबाइल पडला. मोबाइल शोधताना गियर बॉक्सजवळ तिला लहान काळा बॉक्स सापडला. तिने बॉक्स उघडल्यानंतर त्यात पोर्टेबल जीपीएस ट्रॅकर असल्याचे तिला कळले. त्या ट्रॅकरमध्ये एक सीमकार्ड सुद्धा होते. त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीवर नवरा नजर ठेवत असल्याचे तिला कळून चुकले. ट्रॅकरमधील माहिती एका दुसऱ्या डिव्हाईसमध्ये जात होती. त्यामुळे माझी प्रायव्हसी धोक्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.