रजनीकांत यांचा राजकीय संन्यास

चेन्नई : दोनदा राजकीय निवृत्ती आणि पुन्हा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त करून, पक्षही स्थापन केलेल्या रजनीकांत यांनी आता राजकारणाला कायमचा रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांनी निवडणूक न लढविण्याचा …
 

चेन्नई : दोनदा राजकीय निवृत्ती आणि पुन्हा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त करून, पक्षही स्थापन केलेल्या रजनीकांत यांनी आता राजकारणाला कायमचा रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनं त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गाैरव केला. त्याच वेळी रजनीकांत आता राजकीय संन्यास घेतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. आजच्या घोषणेनं ती प्रत्यक्षात आली. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रजनी मक्कल मंद्रम या राजकीय पक्षाचे विसर्जन करून, “भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही’, असं जाहीर केले. त्यांच्या राजकीय पक्षाचे रुपांतर ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये करण्यात येईल. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो’, असं त्यांनी सांगितलं. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती.