मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा बलात्कार; तरीही मॉडेल न बनल्याने तरुणीची पोलिसांत धाव

नवी दिल्ली : मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवून खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या तरुणीवर तिघांनी अनेकदा बलात्कार केला. मात्र त्यांनी मॉडेल बनविले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दिल्लीच्या मयूरविहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. २४ वर्षीय तरुणीला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. सोशल मीडियावर तिची ओळख आदित्य ऊर्फ टोनिशी या तरुणाशी झाली. माझ्या मॉडेलिंग जगतात ओळखी …
 

नवी दिल्ली : मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवून खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या तरुणीवर तिघांनी अनेकदा बलात्कार केला. मात्र त्यांनी मॉडेल बनविले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दिल्लीच्या मयूरविहार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

२४ वर्षीय तरुणीला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. सोशल मीडियावर तिची ओळख आदित्य ऊर्फ टोनिशी या तरुणाशी झाली. माझ्या मॉडेलिंग जगतात ओळखी आहेत. तुला तिथे काम मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले. टोनीने एका हॉटेलमध्ये तिला ऑडिशनसाठी बोलावले. तिथे सुलतान मलिक नावाचा एक तरुण होता. मलिकने अनेक मॉडेलला काम मिळवून दिले, असे टोनीने तिला सांगितले. तिथे तिचे फोटो काढून दोघांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑडिशनची दुसरी फेरी पानिपतला होती. तिथे टोनी, सुलतान आणि आणखी एकाने मॉडेलिंगचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिची निवड झाली, असे सांगून तिला दिल्लीच्या नेब सराई भागात बोलावले. तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मात्र तरीही तरुणीला कोणतेही काम मिळाले नाही. त्‍यामुळे फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.