महिलांच्या स्कर्टखालच्या भागाचे फोटो काढता येणार नाही; इथे झाला हा नवीन कायदा

हाँगकाँग : महिलांवरील वाढते अत्याचार, लैंगिक गुन्ह्यांच्या तक्रारी थांबविण्यासाठी हाँगकाँग देशाने पुढाकार घेतला आहे. महिलांच्या परवानगी शिवाय स्कर्ट खालील भागाचे फोटो कुणी काढत असेल किंवा सोशल मीडियावर शेअर करत असेल तर तसे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचा कायदा या देशाने पारित केला आहे. पुरुषांना लैंगिक गुन्ह्यासाठी असे फोटो प्रेरित करतात, असा एकमुखी सूर या देशाच्या संसदेत …
 

हाँगकाँग : महिलांवरील वाढते अत्याचार, लैंगिक गुन्ह्यांच्या तक्रारी थांबविण्यासाठी हाँगकाँग देशाने पुढाकार घेतला आहे. महिलांच्या परवानगी शिवाय स्कर्ट खालील भागाचे फोटो कुणी काढत असेल किंवा सोशल मीडियावर शेअर करत असेल तर तसे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचा कायदा या देशाने पारित केला आहे.

पुरुषांना लैंगिक गुन्ह्यासाठी असे फोटो प्रेरित करतात, असा एकमुखी सूर या देशाच्‍या संसदेत उमटला. त्यामुळे असा गुन्हा करणाऱ्यांना ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाईची शिक्षा देण्यात येणार आहे. अनेक लोक इंटरनेटवर असे फोटो शेअर करतात. बाजार, मॉल, कॉफी शॉप किंवा सार्वजनिक ठिकाणी असे फोटो गुप्तपणे काढले जातात.

खासगी ठिकाणीसुद्धा असे फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आता गुन्हा ठरणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर लैंगिक गुन्हे कमी होतील, असा विश्वास हाँगकाँगच्‍या प्रशासनाला वाटतो. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या फोटोंमध्ये घट होईल. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया वेबसाइटनी नियम मोडल्यास त्यांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.